३३३ रुपयांमध्ये २७० जीबी डेटा देणार बीएसएनएल


मुंबई – बीएसएनएलने रिलायन्स जिओ आणि इतर कंपन्यांना टक्कर देण्याच्या हेतूने सर्वात स्वस्त प्लान आणले असून आपले ३३३ रुपयांपासून ते ३९५ पर्यंतचे तीन नवे प्लान बीएसएनएलने शुक्रवारी लाँच केले आहेत. ग्राहकांना या प्लानमध्ये दररोज ३जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसारख्या सुविधा मिळणार आहेत. यात एवढाच फरक आहे की एअरटेल, जिओ, आयडिया आणि व्होडाफोन जिथे ४जी डेटा डाटा देतात तिथे बीएसएनएल ग्राहकांना हायस्पीड ३जी डेटा देणार आहे.

ग्राहकांना बीएसएनएलच्या या नव्या ‘ट्रिपल एस’ प्लान अंतर्गत ३३३ रुपयांत ९० दिवसांसाठी दररोज ३जीबी ३जी डेटा मिळणार आहे. याचा अर्थ कपंनी ३३३ रुपयांत २७० जीबी हायस्पीड ३जी डाटा देणार आहे. अशा रितीने ग्राहकांना १जीबी डेटा खर्च करण्यासाठी फक्त एक रुपया २३ पैसे द्यावे लागणार आहे. ‘दिल खोल के बोल’ प्लानदेखील बीएसएनएलने लाँच केला आहे. ३४९ रुपयांच्या या प्लानअंतर्गत ग्राहक अनलिमिटेड लोकल कॉल आणि एसटीडी कॉल करु शकणार आहेत. त्यांना दर दिवशी २ जीबी ३जी डेटा स्पीडवर मिळणार आहे. मात्र त्यानंतर स्पीड ८०kbps होईल. जिओच्या धन धना धन ऑफरशी मिळता जुळता हा प्लान आहे, ज्यामध्ये ग्राहकांना फ्री नॅशनल रोमिंग, अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री डाटा मिळतो. ३९५ रुपयांचा तिसरा प्लान असून यामध्ये ग्राहकांना बीएसएनएल नेटवर्कवर ३००० मिनिटे आणि इतर नेटवर्कवर १८०० मिनिटे फ्री मिळणार आहेत. सोबतच रोज २ जीबी ३जी डेटा वापरु शकणार आहेत.

Leave a Comment