सौदीतही परदेशी कर्मचार्‍यांना काम न देण्याचा निर्णय


अमेरिकेत ट्रंप प्रशासनाने हायर अ्मेरिकन्स योजना सुरू केल्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल टाकताना सौदी सरकारनेही शॉपिंग मॉल्स, दुकानांतून केवळ सौदी नागरिकांनाच काम देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा सर्वाधिक फटका कामाच्या आशेने सौदीत गेलेल्या भारतीय, बांग्लादेशी व पाकिस्तानी कामगारांना बसणार आहे.. देशातील नागरिकांनाच कामावर ठेवून त्यांच्यासाठी रोजगार संधी निर्माण करण्याचा प्रयत्न सौदीकडून केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सौदीने कच्च्या तेल विक्रीवर पूर्णपणे अवलंबून असलेली त्यांची अर्थ्रव्ववस्था आता तेलावरून अन्य उद्योग विकासांकडे वळविण्याचा निर्णय पूर्वीच घेतला आहे. या दीर्घकालीन धोरणाचा भाग म्हणूनच सौदीत परदेशी कामगारांऐवजी स्थानिक कामगारांनाच कामावर ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. यामुळे ३५ हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. कामगार मंत्री खालेद अबा अमल खैल यांच्या म्हणण्यानुसार सौदीत ५० टक्के जनता २५ वयोगटाखालची आहे व त्यांच्यासाठी काम पुरविणे हे मोठे आव्हान आहे.

प्रिन्स व डेप्युटी कमांडर मोहम्मद बिन सुलतान यांनी अर्थव्यवस्थेला गती देताना बाहेरील कर्मचार्‍यांवरचे देशाचे अवलंबित्व कमी करण्यावर भर दिला आहे. सौदीत महिलांमध्ये बरोजगारीचे प्रमाण ३४.५ टक्कयांवर आहे. यात सुधारणा करण्यासाठी महिलांसाठी वस्तू विक्री करणार्‍या दुकानांमधून सौदी महिलांनाच काम दिले जावे अशी सरकारची अपेक्षा आहे.

Leave a Comment