वावे टर्मिनल ब्रँड हॉनर बी टू स्मार्टफोन कंपनीने नुकताच लाँच केला असून हा फोन म्हणजे २०१५ मध्ये लाँच झालेल्या हॉनरचे पुढचे व्हर्जन आहे. रेनबो लाईट ही या फोनची खासियत अ्सून हा फोन बजेट स्मार्टफोन आहे. ७४९९ रूपयांत तो ऑनलाईन रिटेल स्टोअर्समधून विक्रीसाठी उपलब्ध करून दिला गेला आहे. या फोनची रेनबो रिंग कॉल, मेसेज, व अन्य नोटिफिकेशन आल्यास चमकते. त्याचबरोबरच या फोनला डेडिकेटेड स्मार्ट की दिली असून कोणतेही अॅपसाठी ती कस्टमाईज करता येते.
हॉनर बी टू रेनबो रिंगसह आला
हा स्मार्टफोन ४.५ इंची डिस्प्लेसह व ड्युल सिम आहे. त्याला अँड्राईड ५.१ लॉलिपॉप वर आधारित इमोशन यूआय ३.१ ओएस दिली गेली आहे. १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमरी कार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा असलेला हा फोन फोरजी व्होल्ट सपोर्ट करतो. फोनला ड्युअल एलईडी फ्लॅशसह ५ एमपीचा रियर तर २ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. हा फोन वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस, मायक्रो यूएसबी कनेक्टिव्हीटी ऑप्शनसह आहे. ब्लॅक, गोल्ड व व्हाईट कालरमध्ये तो उपलब्ध असून फोनला १५ महिन्यांची वॉरंटी आहे.