सैनिक मग ते कोणत्याही देशाचे असोत, देशसेवेसाठी सदा सज्ज असतात. अनेक अडचणींना तोंड देत देशाचे रक्षण ते करत असतात. कित्येकदा खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, सुरक्षित निवारा नाही अशा परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागतो व अशावेळी अंघोळ करणे कपडे बदलणे या गोष्टी त्यांच्यासाठी चैनीच्या ठरतात. त्यामुळे जगभारतील देश यथाशक्ती आपल्या जवानांची खास काळजी घेत असतात. अमेरिका त्याबाबत जरा आघाडीवर आहे. कारण त्यांनी त्यांच्या सैनिकांसाठी अनेक तर्हेकची उपकरणे उपलब्ध केली आहेत.
लष्करी जवानांसाठी आपोआप स्वच्छ होणार्या अंडरवेअर्स
यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जवानांना आपोआप साफ होणार्या विशिष्ठ कपड्यांपासून बनविलेल्या अंडरवेअर्स दिल्या जातात. वाळवंटी भागात धूळ, घाम, पाण्याची कमतरता यामुळे सैनिकांना विषाणू संसर्गाचे प्रमाण मोठे असते. या खास अंडरवेअर कित्येक दिवस न धुता वापरता येतात. यासाठी मायक्रोवेव्हच्या सहाय्याने नॅनो पार्टिकल्स कपड्यातच अॅड केले जातात.हे पार्टिकल्स पाणी, तेल, बॅक्टेरिया, धूळ यांना चिकटतात. कपड्यातील रसायनामुळे बॅक्टेरिया मारले जातात व त्यामुळे वाढलेल्या प्रेशरच्या सहाय्याने घाण आपोआप कपड्याबाहेर फेकली जाते.
हे कापड तयार करण्यासाठी अमेरिकेने संशोधनावर २० मिलीयन डॉलर्स म्हणजे १३० कोटी रूपये खर्च केले आहेत. संशोधक जेफ ओंवेस यांच्या म्हणण्यानुसार वाळवंटात जितके सैनिक अपघात किंवा फायरिंग मुळे मृत्यूमुखी पडतात त्यापेक्षा कितीतरी अधिक सैनिक या बॅक्टेरियल संसर्गामुळे मृत्युमुखी पडतात. यामुळे दीर्घकाळ संशोधक करून हे विशेष कापड तयार केले गेले आहे.