ज्येष्ठ नागरिकांना एअर इंडियाची विशेष सवलत


नवी दिल्ली : प्रवाशांसाठी नेहमीच विमान कंपनी एअर इंडिया नवीन योजना घेऊन येते. एअर इंडियाने आताही प्रवाशांसाठी नवीन योजना घोषीत केली आहे. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा एअर इंडियाने कमी केली आहे. ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा याआधी ६३ वर्षांची होती. आता ती ६० वर्षांपर्यत केल्यामुळे आता ६० वर्षांच्या व्यक्तींनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार ६० वर्षावरील सर्व प्रवाशांना या योजनेतून तिकिटामध्ये ५० टक्के सूट मिळणार आहे. परंतू ही सूट फक्त देशांर्तगत प्रवासासाठीच असणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना ओळखपत्र आणि वरिष्ठ नागरिकत्वाचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागणार आहे.

Leave a Comment