जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्टवर जाऊन ब्रेकफास्ट करण्याची अथवा लंच घेण्याची कल्पनाही करणे अवघड आहे. मात्र ही कल्पना लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. अर्थात त्यासाठी भारीभक्कम रक्कम मोजावी लागेल म्हणजेच ही चैन सर्वसामान्यांसाठी नाही तर अतिश्रीमंतांसाठीच उपलब्ध होईल असे समजते.
एव्हरेस्टवर करा ब्रेकफास्ट, घ्या लंच
पर्यटन क्षेत्रातील कांही कंपन्यांनी माऊंट एव्हरेस्टला टूरिस्ट डेस्टिनेशन बनविण्याचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यासाठी नवनवीन गोष्टी एक्स्लोअर केल्या जात आहेत. हजारो फूट उंचीच्या शिखरावर ब्रेकफास्ट, लंच हा अनुभव नक्कीच वेगळा असेल. २०१८ पासून ही सेवा सुरू केली जाणार आहे.
त्यात आणखीही एक योजना असून त्यानुसार हॉट एअर बलूनमधून सर्वाधिक उंचीच्या या शिखरावरची सफर करता येणार आहे. लंच ब्रेकफास्टसाठी साधारण साडेसहा कोटी रूपये खर्च येईल. हे पर्यटक ही सेवा घेतील त्यांना डिस्काऊंट रेटमध्ये म्हणजे आणखी काही कोटी रूपये मोजून हॉट एअर बलून सफारी घेता येईल. विशेष म्हणजे या पर्यटनासाठी आत्ताच अनेक जणांनी नोंदणी करण्याची तयारी केली असल्याचेही सांगितले जात आहे.