Skip links

ट्रिपल तलाकवर तोडगा काढणार योगी सरकार!


लखनऊ : देशभरात सध्या ट्रिपल तलाकचा मुद्दा खूपच चर्चेचा विषय बनला असून मुस्लिम महिलांच्या या मुद्द्यावर उत्तर प्रदेशमधील योगी सरकार देखील गंभीरपणे विचार करत असल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणूनच यावर लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

ट्रिपल तलाकमुळे बेघर झालेल्या महिलांसाठी योगी सरकार आश्रय गृह बनवण्याची तयारी करत आहे. हे आश्रय गृह वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बनवण्यात येणार आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर तलाक झालेल्या महिलांसाठी योगी सरकारमधील महिला कल्याण विभाग आश्रय गृह बनवणार आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच कॅबिनेटमध्ये ठेवला जाणार आहे. या कामासाठी कॅबिनेट मंत्री रीता बहुगुणा जोशी इच्छूक आहेत.

उत्तर प्रदेश सरकार महिलांना मदत करण्यासाठी ‘राणी झांसी योजना’ चालवते. या योजनेतून अक्षम महिलांना मदत केली जाते. सरकार या योजनेच्या अंतर्गत मुस्लीम महिलांना मदत करण्याची तयारी करत आहे. यामधून महिलांना आर्थिक मदत केली जाईल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जनता दरबारमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लीम महिला पोहोचल्या आहेत. ज्या ट्रिपल तलाकला बळी पडल्या आहेत. भाजपने निवडणुकीत यालाचा मोठा मुद्दा बनवला होता. २०१९ च्या निवडणुकांना समोर ठेऊन भाजप हा मुद्दा हाताळताना दिसत आहे.

Web Title: yogi government make master plan on triple talaq