लाल दिवा मोडीत काढल्याने देशातील व्हीआयपी संस्कृती खरोखरच नष्ट होणार का ?


मुंबई – शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या लाल दिवे हद्दपार करण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना या हेतूबद्दल शंका उपस्थित केली आहे. लाल दिव्याची दुकाने पंतप्रधान मोदी यांनी मोडीत काढली आहेत. नोटाबंदीप्रमाणेच हा निर्णय धाडसीच म्हणावा लागेल.

प्रश्न एवढाच आहे की देशाला आणि लोकांना नोटाबंदीच्या निर्णयाचा नेमका काय फायदा झाला ते कळायला मार्ग नाही. त्याचप्रमाणे देशातील व्हीआयपी संस्कृती लाल दिवा मोडीत काढल्याने खरोखरच नष्ट होणार आहे काय की सवंग लोकप्रियतेसाठी घेतलेला हा निर्णय आहे? असा प्रश्न उद्धव यांनी सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे. पण भाजपचे राज्य जेथे नाही अशा ठिकाणचे मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांनी लाल दिवा वापरायचाच असा निर्णय घेतला तर तुम्ही काय करणार? असा प्रश्नही अग्रलेखात विचारला आहे.