हा व्हिडिओ बघा आणि पोटधरून हसा


प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसवण्याचा प्रामाणिक प्रयत्न झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील कलाकारांनी केला आहे. अनेक चित्रपटाचे विडंबन करून त्यांनी त्याहूनही जास्त धमाल केली आहे. त्यांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाचे धमाकेदार विडंबन केले होते. हे सादरीकरण झी गौरव सोहळ्यात करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा एक खास व्हिडिओ आजही लोकप्रिय आहे.

भाऊ कदम, निलेश साबळे, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रीके आणि श्रेया बुगडे यांनी झी गौरवच्या कार्यक्रमात धमाकेदर सादरीकरण करून प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावले होते. भाऊ कदम आणि निलेश साबळे या दोघांनी अफलातून काम केले होते. भाऊ कदमने पंडीतजी आणि निलेश साबळे याने खॉं साहेब यांची भूमिका केली होती. याच कार्यक्रमात गाण्याची स्पर्धाही झाली. त्यामुळे आता ही गाण्याची स्पर्धा कशी झाली असेल याचा अंदाज तुम्हाला आहेच.

कदाचित तुम्ही हा कार्यक्रम याआधी पाहिला असेलच पण पुन्हा एकदा पाहिल्याने किंवा त्याहून अधिक वेळ पाहिल्यानेही तुम्ही बोर होणार नसल्यामुळे पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ तुम्ही बघून पोट धरून हसू शकता.

Web Title: Watch this video and laugh