पतीच्या पगारातील २५ टक्के रक्कम पोटगी म्हणून देणे बंधनकारक


नवी दिल्ली : काल सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोट झाल्यावर पत्नीला पतीच्या पगाराच्या २५ टक्के पोटगी द्यावी, असा निर्णय दिला.

कोलकाता उच्च न्यायालयातील एका घटस्फोटाच्या खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायायलाने हा निर्णय दिला आहे. घटस्फोटीत पुरुषाने पुन्हा एकदा अर्ज केला. त्याने आधीच्या पत्नी आणि मुलासाठी द्यावयाची मासिक पोटगी कमी व्हावी, अशी याचिका कोलकाता उच्च न्यायालयात केली. उच्च न्यायालयाने ती फेटाळली. त्यावर पुरुषाने सर्वोच्च न्यायालयात अपील केला. या याचिकेवर सुनावणी देताना कोलकाता न्यायालयाचा निर्णय योग्यच असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे घटस्फोटीत महिलेला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असल्याने तो देशातल्या सर्वच न्यायालयांमध्ये महत्वाचा संदर्भ म्हणून वापरला जाणारा आहे.

Web Title: Supreme Court sets alimony benchmark: 25% of ex-husband’s net salary