‘बाहुबली २’साठी कटप्पाने घेतले नमते


कर्नाटकमध्ये ‘बाहुबली 2 – द कन्क्लूजन’ चित्रपटाबाबत वाढता विरोध पाहून कटप्पा अर्थात अभिनेता सत्यराज यांनी माफी मागितली असून ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करुन सत्यराज यांनी कर्नाटकच्या लोकांची माफी मागितली आहे.

प्रेक्षक दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या ‘बाहुबली २’ चित्रपटाची चातकाप्रमाणे वाट पाहत असून चित्रपट आता प्रदर्शनासाठी तयार असून वाद मात्र सुरुच आहेत. तामिळनाडू आणि कर्नाटकशी संबंधित कावेरी नदी वादात सुमारे ९ वर्षांपूर्वी सत्यराज यांनी कन्नडविरोधी विधान केल्यामुळेच कर्नाटकमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत वाद उफाळला आहे.

सत्यराज यांनी माफीनाम्यात तामिळ लोकांच्या विकासाबाबत कायमच बोलणार. मग यासाठी इंडस्ट्रीमध्ये मला कोणी काम दिले नाही, तरी काही फरक पडणार नसल्याचे सत्यराज स्पष्ट केले. बाहुबली २ चा कर्नाटकमध्ये विरोध सुरु आहे आणि चित्रपट प्रदर्शित न करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर काही स्थानिक पक्षांनी बाहुबली दोन राज्यात रिलीज न करण्याची भूमिका घेतली आहे.