इंटरनेट स्पीड देण्यात रिलायन्स जिओच पुन्हा अव्वल


मुंबई : देशाच्या टेलिकॉम मार्केटमध्ये मागील वर्षी प्रवेश करणारी रिलायंस जिओची मार्चमध्ये सरासरी ४जी डाउनलोड स्पीड १६.४८ होती. एअरटेल आणि आयडिया पेक्षा जी दुप्पट होती. टेलिकॉम रेग्युलेटर ट्राईच्या मासिक अहवालामध्ये अशी माहिती समोर आली आहे की, रिलायंस जिओची सरासरी डाउनलोड स्पीड १६.४८ एमपीबीएस होती. आइडियाचा ८.३३ एमबीपीएस तर एअरटेल ७.६६ एमबीपीएस स्पीड देत होती.

यूजर्स एक बॉलिवूड चित्रपट जवळपास ५ मिनिटात १६ एमबीपीएसच्या स्पीडवर डाऊनलोड करु शकतो. वोडाफोनची मार्चमध्ये सरासरी डाउनलोड स्पीड ५.६६ एमबीपीएस तर रिलायंस कम्युनिकेशनची २.६४ एमबीपीएस, टाटा डोकोमोची २.५२ एमबीपीएस, बीएसएनएलची २.२६ एमबीपीएस आणि एअरसेलची २.०१ एमबीपीएस होती. डाउनलोड स्पीड ही डेटाच्या वास्तविक वेळेच्या आधारावर त्यांच्या मायस्पीड अॅप्लिकेशनच्या मदतीने ट्राय मोजतो.

Leave a Comment