‘राब्ता’मध्ये हा कोण आहे ३२४ वर्षांचा म्हातारा?


सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेनन लवकरच आपल्यासमोर आगामी ‘राब्ता’ या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहे. अभिनेता राजकुमार राव या चित्रपटात एका ३२४ वर्षाच्या म्हाताऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘राब्ता’चा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता त्यामध्ये राजकुमार रावची एक झलक दाखवण्यात आली आहे. निर्माता दिनेश विजान यांनी त्याच्या या लुकसाठी चित्रपट खास लॉस एँजलहून मेकअप आर्टिस्ट बोलावला आहे. हा लूक बनविण्यासाठी त्याला ६ तास लागतात. तसेच या भूमिकेसाठी राजकुमार रावने आपल्या आवाजासोबत बॉडी लॅंग्वेजही बदलली आहे. सध्या सर्वत्र राजकुमारच्या या लूकची चर्चा सुरु आहे.

आपल्या या लूकविषयी बोलताना राजकुमार म्हणाला की, मेकअपच्या दरम्यान मी खूप घामाघूम होतो. परंतू ही भूमिका खूप मजेशीर आहे. ही भूमिका करण्यासाठी मी आधीपासूनच उत्सूक होतो. ही भूमिका करताना मी खूप आनंद लूटला.

Web Title: rajkumar rao first look reveal from raabta movie