अखेर पाकिस्तानसाठीही हाफिज सईद दहशतवादी


नवी दिल्ली – पाकिस्तानने अखेर मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड आणि दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. लाहोर हायकोर्टात यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने सादर केले आहे. दहशतवाद आणि दहशवादी कारवायांशी हाफिज सईदचा संबंध असल्याचे या प्रतिज्ञापत्रात स्पष्टपणे मांडण्यात आले आहे.

काही महिन्यांपासून हाफिज सईदला अवैधरित्या कैदेत ठेवण्यात येत असल्याची याचिका जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेने कोर्टात दाखल केली होती. यावर पाकिस्तान सरकारने कोर्टात सांगितले की, हाफिज सईदविरोधात अशांतता पसरवण्याबाबत पुरेस पुरावे प्राप्त झाले आहेत. शिवाय त्याच्याविरोधात दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Pakistan accept Hafeez Saeed is Terrorist