आयटी क्षेत्रातील ९५ टक्के इंजिनिअर ना’लायक’


नवी दिल्ली – आयटी आणि डेटा सायन्स ईकोसिस्टम क्षेत्रात भारतीय इंजिनिअर बुद्धिमत्तेच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. एका सर्वेक्षणाद्वारे देशातील ९५ टक्के इंजिनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्राशी निगडीत नोकऱ्या मिळवण्यात सपशेल अपयशी ठरत असल्याचे समोर आले आहे.

रोजगार क्षेत्राशी निगडीत कंपनी एस्पायरिंग माइंड्सने केलेल्या एका सर्वेक्षणात जवळपास ४.७७ टक्के उमेदवार प्रोग्रामसाठी योग्य तर्कशास्त्र लिहू शकतात, ज्यांची प्रोग्रामिंग जॉबसाठी कमीतकमी आवश्यकता आहे.आयटी संबन्धित कॉलेजच्या ५०० शाखांच्या ३६००० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑटोमेटा नामक एका टेस्टमध्ये भाग घेतला. या टेस्टमध्ये दोन तृतियांश म्हणजेच ६० टक्के विद्यार्थ्यांना बरोबर कोड देखील लिहिता आला नाही.

Leave a Comment