अमेरिकेची राखरांगोळी करू – उत्तर कोरियाचा इशारा


अमेरिकेवर महाशक्तीशाली पहिला हल्ला करून तिची राखरांगोळी करू, असा इशारा उत्तर कोरियाने दिला आहे. उ. कोरियाच्या आण्विक कार्यक्रमावरून त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न अमेरिका करत आहे, असे विधान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांनी केले होते. त्याच्या उत्तरादाखल उ. कोरियाने हे वक्तव्य केले आहे.

“जेव्हा आमचे महाशक्तीशाली पहिले हल्ले सुरू होतील, तेव्हा दक्षिण कोरियातील आक्रमणकारक साम्राज्यवादी अमेरिकी सैन्यच नव्हे तर अमेरिकेची मुख्य भूमीही त्वरित आणि पूर्णपणे नष्ट होईल,” असे रोडोंग सिनमुन या वृत्तपत्राने म्हटले आहे. हे वृत्तपत्र उ. कोरियाच्या सत्ताधारी वर्कर्स पार्टीचे अधिकृत मुखपत्र आहे.

दरम्यान, दक्षिण कोरियाचे हंगामी पंतप्रधान ह्वांग क्योआह्न यांनी गुरुवारी सैन्य व संरक्षण मंत्रालयाला दक्ष राहण्याचे दिले. तसेच, द. कोरिया व अमेरिकेची हवाई दले मिळून वार्षिक लष्करी कवायत करत आहेत, याची द. कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने पुष्टी दिली आहे.

Web Title: North Korea warns US 'don't mess with us' as Kim Jong-un threatens 'super-mighty preemptive strike'