२ लाखांनी स्वस्त झाली निसानची कार


मुंबई : आपल्या मध्यम श्रेणीच्या सेडान कार सनीची किंमत जपानची कार बनवणारी कंपनी निसानने १.९९ लाख रुपयांनी कमी केली असून आता सनीची दिल्लीच्या शोरूममध्ये किंमत ६.९९ लाख रुपये असणार आहे. जी ८.९९ लाख रुपयांना ऑन रोड मिळेल.

१.०१ लाख रुपयांनी पेट्रोल व्हर्जनची किंमत कमी करण्यात आल्यानंतर आता सनीची नवी किंमत ६.९९ लाख रुपये असणार आहे. सगळ्यात अॅडवान्स व्हर्जनची किंमत १.९९ लाख रुपयांनी कमी केल्यानंतर त्याची नवी किंमत ८.९९ लाख रुपये असणार आहे. डीजल व्हर्जनच्या मॉडलची किंमत १.३१ लाख रुपयांनी कमी केली आहे. त्याची नवी किंमत आता ७.४९ लाख रुपये असणार आहे.

Web Title: Nissan cuts price of sunny sedan by 2 lakhs