मौलवीची सोनूवर आगपाखड सुरूच


मुंबई – गायक सोनू निगमवर अनेकांनी मशिदीमध्ये होणाऱ्या अजानविरोधात ट्विट केल्यानंतर आगपाखड केली. सोनू निगमने धार्मिक स्थळांच्या ठिकाणी होणारा लाउडस्पीकरचा वापर यावर केलेले ट्विट हे संविधानाचा अनादर करणारे असल्यामुळे त्याने देश सोडण्याचा विचार करायला हवा, असे मत पश्चिम बंगाल अल्पसंख्यक संयुक्त परिषदेचे उपाध्यक्ष मौलवी सय्यद शाह यांनी व्यक्त केले.

सोनू निगमने अजानवर भाष्य केल्याने अनेक भारतीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्याने लवकरात लवकर सर्वांची माफी मागावी. नाहीतर दहा लाख रुपयांचे बक्षिस मिळवण्यासाठी मी दिलेल्या इतर अटीही पूर्ण कराव्यात, असे मौलवी म्हणाले. सोनू निगमने मुंडन करून घेतले, पण मी सांगितलेल्या अजून दोन अटी त्याने पूर्ण करणे बाकी आहे. त्याने गळ्यात चपलांचा हार घालावा आणि संपूर्ण देशभर फिरावे असेही मी सांगितले होते. जेव्हा तो या दोन्ही अटी पूर्ण करेल तेव्हा मी स्वतः पत्रकार परिषद बोलावून त्याला चेक देईन.