रेल्वेत वाढणार ३ टायर एसी डब्बे


नवी दिल्ली – रेल्वेने टप्प्या टप्प्याने २ टायर एसी डबे कमी करून त्याऐवजी ३ टायर एसी डबे वाढवण्याचा निर्णय घेतला असून १३ हजार रेल्वेतील २ टायर एसी डबे हळूहळू भारतीय रेल्वे हद्दपार करेल. यासोबत २०-२२ डबे असलेल्या रेल्वेंमध्ये २४ डबे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याजागी ३ टायर एसी वाढवण्यात येतील.

३ टायर एसी मधून रेल्वेचा जास्तीत जास्त गुंतवणूक खर्च निघतो. ३ टायर एसी रेल्वेतूनच नफाही होत असल्यामुळे स्लीपर कोच कमी करून ३ टायर एसी डबे वाढवण्याच्या विचारात रेल्वे असून याव्यतिरिक्त रेल्वे बोर्डाने प्रवाशांचा वाढता विरोध पाहता फ्लेक्सी भाडे प्रणाली बंद करण्याचा निर्णय घेतला असून सध्या राजधानी, शताब्दी, दुरांतो यासारख्या १४३ रेल्वेंमध्ये ही प्रणाली लागू केली असून आता त्याऐवजी सर्व रेल्वेंमध्ये मूळ भाडे एकाचवेळी वाढवले जाईल. सर्व रेल्वेंच्या भाड्यात १० ते १५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर रेल्वेने तिकीटरद्द करण्याच्या नियमांत लवकरच बदल होण्याची शक्यता वर्तवली असून रेल्वेला उशीर होणार असेल तर त्याचा एसएमएस प्रवाशाला पाठवण्यात येईल. चार डझनपेक्षा अधिक रेल्वे वेळेत धावण्यासाठी पावले उचलली जातील. दरम्यान भविष्यात स्लीपर कोचची संख्याही रेल्वे कमी करू शकते.

Leave a Comment