कसे कराल मोबाइल वॉलेटद्वारे गॅस सिलिंडरचे पेमेंट


नवी दिल्ली – मोदी सरकारने कॅशलेस आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आता नवे पाऊल उचलले आहे. आता एलपीजी म्हणजेच घरगुती गॅस सिलिंडर रिफिल करण्यासाठी आता पेमेंट करण्याची पद्धत खुपच सोपी करण्यात आली आहे. यापूर्वीच पेट्रोलियम मंत्रालयाने प्रसिद्ध केलेले एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डच्या व्यतिरिक्त प्रीपेड मोबाइल वॉलेटच्या माध्यमातून गॅस सिलिंडरचे पेमेंट करण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहे. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमचे घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांना या सुविधेच्या माध्यमातून कॅश, ऑनलाइनसोबतच प्रीपेड मोबाइल वॉलेटद्वारे पेमेंट करुन उपलब्ध होणार आहेत.

मोबाइल वॉलेटच्या माध्यमातून एलपीजी सिलिंडर रिफिलचे पेमेंट करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या मोबाइलमध्ये कोणतेही एम-वॉलेट डाउनलोड करा. एम-वॉलेट डाऊनलोड केल्यानंतर तुमचा मोबाइल क्रमांक रजिस्टर्ड करा. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या एम-वॉलेटमध्ये पैसे डिपॉझिट करु शकता. एम-वॉलेटमध्ये पैसे टाकल्यानंतर मोबाइल फोन एम-वॉलेट बनेल आणि त्यानंतर तुम्ही पेमेंट करु शकाल. एलपीजी सिलिंडरचे पेमेंट करण्यासाठी तुम्ही (PAY) ऑप्शनचा वापर करु शकता. यासोबतच तुम्ही कोड स्कॅनकरुन एलपीजी डिस्ट्रिब्युटरचा मोबाइल नंबर इनपुट करा त्यानंतर तुमचे पेमेंट होईल.

Leave a Comment