हिरा व्यापाऱ्याने १२५ कर्मचाऱ्यांना दिली स्कूटी भेट


सूरत : हिरा व्यापारी लक्ष्मीदास वेकारिया यांनी कर्मचाऱ्यांच्या कामावर खूश झाल्याने त्यांनी आपल्या १२५ कर्मचाऱ्यांना स्कूटी भेट केली आहे. एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन यासाठी करण्यात आले होते. ज्यामध्ये या कर्मचार्‍यांना या स्कूटी देण्यात आल्या. प्रत्येक स्कुटीवर तिरंगा देखील लावण्यात आला होता. वेकारिया यांनी २०१० मध्ये हिऱ्याचा व्यवसार सुरु केला होता. गुजरातमध्ये असे करणारे वेकारिया हे ऐकटे नाही. हिरा व्यापारी सवजी भाई ढोलकिया देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांना अशा भेट देत असतात.

मागील वर्षी हरे कृष्णा एक्सपोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांना ढोलकिया यांनी दिवाळीला ४०० फ्लॅट्स आणि १२६० कार गिफ्ट केली होती. कंपनीने यासाठी ५१ कोटी खर्च केले होते. त्याचबरोबर ५६ कामगारांना दागिने देखील दिले होते.

Web Title: gujarat Diamond trader handed over 125 employees to a scooty