व्हीआयपी कल्चरला मोदी सरकारचा दुसरा धक्का


नवी दिल्ली – मोदी सरकारने देशातील व्हीआयपी कल्चर संपवण्यासाठी व्हीआयपींच्या गाड्यांवरील लाल दिवे काढण्याचे आदेश दिल्यानंतर आता सरकारने व्हीआयपी कल्चरला दुसरा धक्का दिला आहे. आता मोदी सरकारने व्हीआयपींच्या गाडीवरील लाल दिवा गेल्यानंतर आता व्हीआयपींच्या गाड्यांना सुरक्षा पुरवणाऱ्या वाहनांवरील निळे दिवेदेखील काढण्याचा निर्णय घेतला आहे.

गुरुवारी नव्या अधिसूचनेचा मसुदा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने तयार केला आहे. नव्या अधिसूचनेतील मसुद्यानुसार निळा, लाल आणि पांढरा असा बहुरंगी दिवा वापरण्याचे अधिकार फक्त आपत्कालीन आणि आपत्ती व्यवस्थापन सेवा देणाऱ्या विभागांनाच असणार आहेत. राज्य सरकारांना कोणत्या वाहनांवर दिवे लावायचे, याचा निर्णय घेण्याचे अधिकार आतापर्यंत होते. पण आता हे सर्व अधिकार केंद्राकडे असणार आहेत.

नव्या अधिसूचनेचा मसुदा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने तयार केला असून त्याबद्दल सध्या लोकांच्या सूचना मागवल्या असून वाहनावर दिवा लागून त्यावरील कारवाई टाळण्यासाठी तो झाकून ठेवणेदेखील या नव्या अधिसूचनेमुळे अशक्य होणार आहे. सध्याच्या नियमांमुळे वाहनावर दिवा लावून त्यामुळे होणारी कारवाई टाळणे शक्य होते.