Skip links

उघड पडला धनुषच्या तोतया आई-वडीलांचा खोटारडेपणा


चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेता धनुषचे आई-वडील असल्याचा दावा करणाऱ्या दाम्पत्याची याचिका मद्रास उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली असून धनुषने पालकत्वाचा वाद जिंकला असून

आपणच धनुषचे खरे आई-वडील असल्याचा दावा तामिळनाडूमधील एका वयोवृद्ध जोडप्याने केला होता. थिरुप्पुवनम गावातील ६५ वर्षीय कथिरेसन आणि ५३ वर्षीय मीनाक्षी यांनी धनुष आपला मुलगा असल्याचा दावा करणारी याचिका दाखल केली होती. धनुषच्या वकिलांनी मात्र हा पैसे उकळण्यासाठी केलेला खटाटोप असल्याचे सांगितले होते.

सुपरस्टार रजनीकांत यांचा धनुष हा जावई असून धनुषचा १८ नोव्हेंबर २००४ ला रजनीची कन्या ऐश्वर्याशी लग्न केले. धनुष-ऐश्वर्याला यात्रा आणि लिंगा अशा दोन मुली आहेत. धनुषने दंडाधिकारी न्यायालयातील याचिका रद्द करण्याची मागणी मद्रास उच्च न्यायालयात केली होती.

धनुष हा आपला तिसरा मुलगा आहे. आमच्या उदरनिर्वाहासाठी त्याने आम्हाला महिन्याला ६५ हजार रुपये द्यावेत, अशी मागणी दाम्पत्याने आपल्या याचिकेत केली होती. धनुष शाळेत असताना लहानपणीच घर सोडून पळाला होता. चेन्नईत जाऊन सिनेजगतात काम करण्यासाठी त्याने घर सोडले होते. आम्ही शोध घेऊनही तो सापडला नव्हता. मात्र चित्रपटामध्ये दिसल्यानंतर आम्ही त्याला ओळखल्याचेही त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते.

नोव्हेंबर २०१६मध्ये धनुष अकरावीत असताना हॉस्टेलमधून पळून गेला होता, असे या दाम्पत्याने सांगितले होते. धनुषच्या गळ्याच्या उजव्या बाजुला एक तीळ आहे, तर उजव्या मनगटावर व्रण आहे, असा दावा दाम्पत्याने केला होता. या दोन्ही जन्मखुणांविषयी शाळा हस्तांतरण दाखल्यात माहिती असल्याचेही त्यांनी म्हटले होते. सरकारी डॉक्टरांकडून २८ फेब्रुवारीला धनुषच्या शरीरावरील जन्मखुणांची तपासणी झाली. मदुराईतील राजाजी सरकारी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांच्या उपस्थितीत ही तपासणी करण्यात आली. डीएनए टेस्टला धनुषने नकार दिला होता, मात्र धनुषच्या शरीरावर कोणत्याही जन्मखुणा आढळल्या नाहीत. गळ्यावरील तीळ लेसर तंत्रज्ञानाने काढून टाकता येऊ शकतो, मात्र व्रण हटवता येऊ शकत नाहीत, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते.

धनुषचे कस्तुरी राजा हे बायोलॉजिकल पिता नाहीत. हॉस्टेलमधून पळून गेल्यावर त्याने कस्तुरी राजांकडे आश्रय घेतला. सुरुवातीला तो नोकर म्हणून राहत होता. मात्र चित्रपटात त्याला मिळालेले यश पाहून कस्तुरी राजांच्या कुटुंबीयांनी त्याला स्वीकारल्याचा दावा या दाम्पत्याने केला आहे.

Web Title: dhanush fake parents lies