शेफ विष्णू मनोहर विश्वविक्रमाच्या तयारीत


नागपूर : नागपुरात प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या सलग ५२ तास स्वयंपाक करण्याच्या विक्रमाला सुरुवात झाली असून ते सलग तीन दिवस जागतिक विक्रम रचण्यासाठी खाद्यपदार्थ बनवणार आहेत.

शुक्रवारी मॅरेथॉन स्वयंपाक उपक्रमाचे आयोजन मैत्री परिवारातर्फे इन्स्टिट्युट ऑफ इंजिन‌िअर्स येथे करण्यात आले आहे. सलग ५२ तासांत एक हजारापेक्षा जास्त शाकाहारी पदार्थ तयार करुन विश्वविक्रम स्थापन करण्याचा प्रयत्न या उपक्रमात विष्‍णू मनोहर हे करतील.

४० तास सलग स्वयंपाक करण्याचा जागतिक विक्रम यापूर्वी नोंदवण्यात आला आहे. १२ मार्च २०१४ रोजी ४० तास कुकिंगचा विक्रम अमेरिकेतील ग्रीन व्हिलेजचे बेंजामिन पेरी यांनी नोंदवला आहे. विष्णू मनोहर हा विक्रम मोडण्याचा प्रयत्न नागपुरात करतील. या उपक्रमाची सुरुवात शुक्रवारी २१ एप्रिलला सकाळी ७.१५ वाजता झाली. २३ एप्रिलच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा खाद्यपदा‌र्थांचा उत्सव चालणार आहे. या मॅरेथॉन उपक्रमात जवळपास सर्व भारतीय खाद्यपदार्थ तयार केले जातील. केवळ ४० पदार्थ हे भारताबाहेरील असतील.

Web Title: Chef Vishnu Manohar would be attempting a Guinness World Record