देशमुखांच्या गडाला भाजपने लावला सुरुंग


लातूर : काँग्रेसचे दिव्ंगत नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी शाबूत ठेवलेल्या लातूर गडाला भाजपने मोठा सुरुंग लावला असून महानगरपालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत काँग्रेसचा धुव्वा उडवल्या विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांना हा गड कायम राखण्यात अपयश आले आहे.

आज चंद्रपूर, लातूर आणि परभणी या तीन महानगरपालिकांमध्ये झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. भाजपने यामध्ये सत्ताधाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित देशमुख, भाजप नेते संभाजी निलंगेकर-पाटील यांचे प्रतिष्ठापणाला लागली होती. मात्र निलंगेकर-पाटील यांनी बाजी मारल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.

या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत ३६ पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस २२ तर भाजप ३६ जागांवर आघाडीवर होते. काँग्रेसची येथील सत्ता भाजपने हिसकावून घेतल्यामुळे देशमुख गडाला जोरदार हादरा बसला आहे.

Web Title: bjp wins latur corporation election 2017