सुधीर मुनगंटीवार यांचे चंद्रपूरात वर्चस्व कायम


चंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात आपले वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवले असून चंद्रपूर महापालिकेत भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या काँग्रेसने नेतृत्वात निवडणूक लढली पण त्यांना फारसे यश मिळवता आलेले नाही.

आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये २७ ठिकाणी भाजपला आघाडी मिळाली आहे. तर काँग्रेसची अवघ्या ९ जागांवर आघाडी मिळली आहे. एकूण ६६ जागांपैकी ३४ जागा मिळवणे गरजेचे असल्यामुळे येथेही सत्ता राखण्यात भाजपला यश मिळते आहे असे म्हणायला हरकत नाही.

Web Title: bjp wins chandrapur corporation election 2017