वीरप्पनला पुन्हा मारणार अक्षय?


बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने चंदन तस्कर वीरप्पनचा खातमा करणारे पोलीस अधिकारी के. विजय कुमार यांची भूमिका साकारण्याची इच्छा बोलून दाखवली असून ‘रुस्तम’ चित्रपटात के. एम. नानावटी या नेव्ही अधिकाऱ्याची भूमिका केल्यानंतर अक्षयला आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारण्याचे वेध लागले आहेत.

२००४ मध्ये कर्नाटक तामिळनाडूच्या सीमेवरील जंगलात के. विजय कुमार यांनी वीरप्पनला ठार मारले होते. ‘वीरप्पन – चेसींग द ब्रिगँड’ या के. विजय कुमार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पार पडले. या समारंभाला अक्षय हजर होता. वीरप्पनवर चित्रपट बनल्यास कोणती भूमिका करायला आवडेल असे विचारले असता अक्षय म्हणाला, दोन्ही म्हणजे वीरप्पन आणि के. विजय कुमार याच्या व्यक्तीरेखा रंजक आहेत. पण मला विजय कुमार यांची भूमिका करायला आवडेल. कारण या मोहिमेचे संपूर्ण नियोजन कुमार यांनी केले होते. अतिशय साहसाने त्यांनी याची अंमलबजावणी केली.

Web Title: Akshay Kumar Wants To Play Police Officer Who Killed Veerappan