फिंगरप्रिंट सेन्सरसह आले मास्टर क्रेडीट कार्ड


वित्तसेवा देणार्‍या मास्टर कार्डने त्यांची फिंगरप्रिंट सेन्सरसह असलेली क्रेडीट कार्ड लाँच केली आहेत. दक्षिण अफ्रिकेतील या कार्डच्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर ही कार्ड लाँच करण्यात आली. मोबाईल फोन पेमेंट तंत्रज्ञानाप्रमाणेच या कार्डसाठीचे तंत्रज्ञान आहे.

हे कार्ड वापरताना युजरला खरेदी केली की सेंसरवर बोट ठेवावे लागेल. तज्ञांच्या मते फिंगरप्रिंट सेन्सर कार्ड ही पूर्णपणे हॅकप्रूफ नाहीत तरीही बायोमेट्रीक तंत्रज्ञानाचा चांगला वापर यात केला गेला आहे. मास्टर कार्डचे अधिकारी अजित भल्ला म्हणाले या कार्डमुळे युजरला जादा सवलत व सुरक्षा मिळू शकणार आहे.

बर्लीन सिक्युरिटी रिसर्च लॅबचे शास्त्रज्ञ कार्स्टन म्हणाले, फिंगरप्रिंट तंत्रज्ञान हे पूर्णपणे सुरक्षित म्हणता येणार नाही. कारण यात फिंगरप्रिंट बदलण्याची संधी नऊवेळा मिळू शकते. चिप व पिन काँबिनेशनमध्ये पिन कमजोर समजला जातो अशावेळी फिंगरप्रिंट हा चांगला उपाय त्यावर आहे. फिंगरप्रिंट सेन्सरसहच्या क्रेडीट कार्डचा वापर युजर फक्त दुकानातून खरेदी करतानाच करू शकणार आहेत. ऑनलाईन खरेदीसाठी पूर्वीप्रमाणेच सुरक्षा उपाय असतील असेही स्पष्ट केले गेले आहे.

Leave a Comment