टाटाची क्लच विरहित बस लाँच


टाटा मोटर्सने त्यांच्या व्यावसायिक वाहन क्षेत्रात ऑटामेटेड मॅन्यूअल ट्रान्समिशन तंत्रज्ञानाने बनलेली क्लचविरहित बस (एटीएम टेक्नॉलॉजी) सादर केली असून या बसची दिल्लीतील एक्स शोरूम किमत २१ लाखांपासून सुरू होत आहे. स्टारबस व अल्ट्रा श्रेणीतील ही बस मार्केटमध्ये विविध कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध करून दिली गेली आहे.

व्यावसायिक वाहन विभागाचे ज्येष्ठ अधिकारी रवी पिशेारडी या संदर्भात माहिती देताना म्हणाले, ही बस खास करून शहरी वापरासाठी आहे. या बसला क्लच नाही. अ्रॅक्सिलरेटर व ब्रेक पॅडलचा वापर करून ही बस चालते. या तंत्रज्ञानामुळे चालकाला गिअर बदलणे अतिशय सोपे जाते व चालकासाठी ही गाडी चालविणे अधिक सुरक्षित व आरामदायी ठरते. या बससाठी वॅबकोने तंत्रज्ञान विकसित केले आहे. टाटाच्या व्यावसायिक वाहन विक्रीत यंदा १० ते १५ टक्के वाढ होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment