चीनची मोबाईल उत्पादक कंपनी शाओमीने आपला मोस्ट अवेटेड एमआय ६ हा स्मार्टफोन अखेर लाँच केला आहे. एमआय ६मध्ये स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर, ६ जीबी रॅम आणि ड्युअल रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. चीनी मार्केटमध्ये शाओमी एमआय ६च्या ६ जीबी आणि ६४ जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत २३,५०० रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर ६जीबी और १२८ जीबी स्टोरेज क्षमतेच्या वेरिएंटची किंमत २७,००० रुपये ठेवण्यात आली आहे. चीनमध्ये या स्मार्टफोनची विक्री २८ एप्रिलपासून सुरु होणार आहे. एमआय ६मध्ये कंपनीने ५.१५ इंचाचा डिस्प्ले,३डी ग्लास, २.४५ गीगाहर्ट्ज़ ६४-बिट ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये मल्टी टास्किंगसोबत ६ जीबी रॅम देण्यात आले आहेत.