पर्यटकांनी जम्मू आणि काश्मीरकडे फिरवली पाठ


शिमला – पर्यटक सदैव अशांतता नांदणाऱ्या जम्मू आणि काश्मीर राज्यात पाय ठेवायला तयार नसून पर्यटकांवर उदरनिर्वाह करणाऱ्या पर्यटक व्यापाऱ्यांना यांचा आर्थिक फटका बसला आहे.

फुटरतावाद्यांनी राज्यात मागील अनेक दिवसांपासून केलेल्या हिंसक कारवायामुळे राज्य पूर्णपणे अस्थिर बनले आहे. देश आणि विदेशातील नागरिकांनी याच कारणामुळे जम्मू आणि काश्मीरला टाळत वातावरण तापले असले तरी शिमल्याला पसंती दिली आहे. टुरिस्ट बस आणि हॉटेल्सच्या बुकिंगमध्ये वाढ झाल्याने शिमल्यातील पर्यटक व्यापाऱ्यांनी भाव वाढ केली आहे.

पर्यटक काश्मिरात जाणे टाळत हिमाचल प्रदेशात येत आहेत. शिवाय, वातावरण तापले असले तरी पर्यटकांची राज्यातील शिमल्याला पसंती मिळत आहे, अशी माहिती पर्यटक व्यापारी के.सी. ठाकूर यांनी दिली. हॉटेलमधील खोल्या अगोदरच बुक झाल्या आहेत, असेही ते म्हणाले. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जम्मू आणि काश्मीरच्या तुलनेत पर्यटकांना हिमाचल प्रदेशच्या सुरक्षित आहे, अशी प्रतिक्रिया अमृतसरचे पर्यटक सागर पुरी यांनी दिली.

Leave a Comment