रेल्वे टॉयलेट्सला मिळणार अत्याधुनिक आणि स्टायलिश लूक


नवी दिल्ली – आता कायमस्वरुपात त्रासदायक आणि त्रासदायक ठरणारा अस्वच्छ शौचालयांचा रेल्वे प्रवाशांचा मुद्दा संपुष्टात येणार असून रेल्वेमधील शौचालयांमध्ये मोठे बदल रेल्वेकडून केले जाणार असल्यामुळे आता अस्वच्छ आणि दुर्गंधी असणाऱ्या शौचालयांच्या वापरापासून रेल्वे प्रवाशांची मुक्तता होणार आहे. विमानातील शौचालयांसारखीच शौचालये एसी आणि नॉन एसी अशा दोन्ही प्रकारच्या डब्यांमध्ये असणार आहेत.

कोरियन मटेरियलचा वापर या नव्या शौचालयांमध्ये करण्यात आला आहे. एलईडी दिवे रेल्वेतील एसी डब्यांमधील शौचालयांमध्ये वापरण्यात येणार आहेत. रेल्वेच्या शौचालयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून स्टिलचे सिंक पाहायला मिळतात. रेल्वेच्या शौचालयांची स्टिलचे सिंक ही जणू ओळख बनली आहे. मात्र आता स्टिलच्या सिंकऐवजी रेल्वेच्या डब्यांमध्ये मॉड्युलर वॉश बेसिन पाहायला मिळेल.

निळ्या रंगाची आणि अत्याधुनिक अशी नॉन एसी डब्यांमधील शौचालये असतील, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासोबतच दुर्गंध घालवणारी स्वयंचलित यंत्रणा या शौचालयांमध्ये असेल. विमानांमधील शौचालयांसारखीच या शौचालयांमधील पाईप्सची आणि लॉकची रचनादेखील असेल. सध्याची शौचालये बदलून त्या जागी अत्याधुनिक शौचालये बसवण्यासाठी रेल्वेला प्रत्येक शौचालयामागे साडे तीन लाखांचा खर्च येणार आहे.

Leave a Comment