अजानमुळे खूप शांतता मिळते – प्रियंका चोप्रा


गायक सोनू निगमने मशिदीवरील भोंग्यांवरून होणा-या अजानबाबत ट्विट केल्यानंतर सुरु झालेला वाद अद्याप शमलेला नाही. रोज काही ना काहीतरी नवीन तोंड या वादाला फुटत आहे. सोनू निगमने बुधवारी पत्रकार परिषद घेत आपली बाजून मांडली. त्याने यावेळी मुस्लीम मित्राकडून मुंडण करून घेत, मुस्लीम नेत्याने दिलेल्या धमकीला सडेतोड उत्तरही दिले.

एकीकडे हा वाद सोशल मीडियावर चांगलाच पेटला असताना दुसरीकडे अभिनेत्री प्रियंका चोप्राचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होऊ लागला असून प्रियंका चोप्रा या व्हिडीओमध्ये अजानबद्दल बोलत आहे. प्रियंका चोप्रा गंगाजल चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच्या आठवणी शेअर करत सांगत आहे की, संध्याकाळी पॅकअप झाल्यानंतर छतावर बसून मी अजान ऐकत असे. मला त्यामुळे खूप शांती मिळत असे. प्रियांकाने सांगितल्यानुसार अजान तिच्या कानामध्ये संगीताप्रमाणे वाजायचे.