काही अशी आहे अजिंक्यची प्रेमकहाणी!


आपल्या अफलातून आणि संयमी बॅटींगसाठी टीम इंडियाचा मिस्टर डिपेंडेबल म्हणून ओळखला जाणारा मराठमोळा अजिंक्य रहाणे ओळखला जातो. सध्या तो रायझिंग पुणे सुपरजाएंट टीमसाठी खेळतो आहे. त्याने काही सामन्यांमध्ये चांगला खेळ केला आहे. तर काहींमध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. त्याच्या नियमबद्ध बॅटींगसाठी अजिंक्य रहाणेचं कौतुक केले जाते. त्याला सचिननंतर चांगला बॅट्समन मानणारे अनेकजण आहेत. पण आम्ही आज त्याच्या क्रिकेटबद्दल नाहीतर त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

अजिंक्यचा प्रेमविवाह झाला आहे. त्याच्या शेजारी राहणारी त्याची बालमैत्रीण राधिकासोबत त्याने लग्न केले. त्याने नुकताच राधिकाचा वाढदिवस साजरा केला. अजिंक्य आणि राधिका धोपावकर हे शेजारी होते. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. दोघांचे परिवार ऎकमेकांना ओळखत होते.

दोघांचेही कुटुंबीय या दोघांच्या नात्याबद्दल जाणून होते. दोघांचे हे नाते फार काळ लपू शकले नाही. दोघांच्या कुटुंबियांनी त्यानंतर दोघांच्या लग्नाबाबत बोलणी केली. सप्टेंबर २०१४ मध्ये अजिंक्य रहाणे आणि राधिकाचे दोघांच्या परिवारांच्या सहमतीनुसार प्रेमविवाह झाला. सोशल मीडीयात लग्नावेळी राधिकाचा आपली बेस्ट फ्रेन्ड आणि वाईफ असा उल्लेख अजिंक्यने केला होता. अजिंक्यला राधिका प्रेमाने जिंक्स अशी हाक मारते. आता तर हे नाव अजिंक्यच्या ड्रेसिंग रूमपर्यंत पोहोचले आहे. त्याचे टीममधील मित्रही त्याला आता जिंक्स म्हणूनच हाक मारतात. अजिंक्यचे वडील हे बेस्टमध्ये काम करत होते तर राधिकाचे वडील हे मर्चंट नेव्हीमध्ये होते.