‘नच बलिये’मधून सिद्धार्थ-तृप्ती बाहेर


आता काहीच दिवस ‘नच बलिये’ या डान्स रिअॅलिटी शोच्या आठव्या पर्वाला सुरुवात होऊन लोटले असून अनेक लोकप्रिय जोडप्यांनी सेलिब्रिटी जोडप्यांच्या नृत्याची झलक दिसणाऱ्या या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतल्याचा पाहायला मिळाले. मराठी भाषिक प्रेक्षकांसाठीसुद्धा ‘नच..’चे हे पर्व महत्त्वाचे ठरत होते. या क्रार्यक्रमात विनोदी भूमिका करणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव सपत्नीक सहभागी झाला होता.

नुकत्याच या कार्यक्रमाच्या बाद फेऱ्या सुरु झाल्या असून, उत्कर्षा नाईक आणि तिचा पती मनोज वर्मा यांचे ‘नच..’ मधील आव्हान संपुष्टात आले. त्यामागोमाग ‘नच..’च्या मंचाला आता सिद्धार्थ आणि तृप्तीही रामराम ठोकणार आहे. सिद्धार्थचा ‘नच बलिये’मधील आतापर्यंतचा प्रवास फार सुरेख राहिला असून, त्याने तिथेही सर्वांची मने जिंकली.