मुंबई : भारतात सॅमसंगने गॅलक्सी एस ८ आणि गॅलक्सी एस ८ प्लस हो दोन स्मार्टफोन लाँच केले असून हे दोन्ही स्मार्टफोन सॅमसंगने तीन आठवड्यांपूर्वी अमेरिकेत लाँच केले होते.
सॅमसंगने भारतात लाँच केले गॅलक्सी एस ८ आणि एस ८ प्लस
५ मे पासून विक्रीसाठी सॅमसंगचे हे दोन्ही स्मार्टफोन उपलब्ध होणार आहेत. मात्र फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या वेबसाईटवर प्री-बुकिंग आतापासूनच केली जाऊ शकते. काही निवडक ठिकाणी हे फोन ऑफलाईनही विक्रीसाठी उपलब्ध असतील.
सॅमसंग गॅलक्सी एस ८ ची किंमत ५७ हजार ९०० रुपये, तर एस ८ प्लसची किंमत ६४ हजार ९०० रुपये ठेवण्यात आली आहे. हे फोन ब्लॅक, ब्ल्यू आणि गोल्ड कलरमध्ये असतील. अमेरिकेत एस ८ ची किंमत ४६ हजार ७०० रुपये, तर एस ८ प्लसची किंमत ५४ हजार ५०० रुपये आहे. यास्मार्टफोनसोबत प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना कंपनी वायरलेस चार्जर मोफत देत आहेत. इतर देशांमध्ये कंपनी या फोनसोबत एकेजी हेडफोन्स मोफत देत आहे. यावेळी सॅमसंगने या फोनच्या डिझाईनमध्येही आकर्षक बदल केले आहेत.
गॅलक्सी एस ८मध्ये ५.८ इंच एचडी स्क्रिन, १२ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, बायोमेट्रिक अनलॉक सिस्टीम (फेस डिटेक्शननेही फोन अनलॉक करता येईल), सॅमसंग Exynos 8895 प्रोसेसर, ४जीबी रॅम, ३००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
गॅलक्सी एस ८ प्लसमध्ये ६.२ इंच एचडी स्क्रिन, १२ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा बायोमेट्रिक अनलॉक सिस्टीम (फेस डिटेक्शननेही फोन अनलॉक करता येईल), ४जीबी रॅम, ३५०० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.