आणखी चार भाषेत सैराटचा रिमेक


मराठी फिल्म इंडस्ट्रीचे कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडत मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट सैराटने १०० कोटींपेक्षाही अधिकची कमाई केली. एक मराठी चित्रपट हिंदीपेक्षाही अधिक कमाई करू शकते, हे बघून अनेकांना त्याचा रिमेक बनवायचा मोह अनेकांना आवरला नाही. या चित्रपटाच्या रिमेकचे दक्षिणी भाषेतील चित्रपटाचे अधिकार कन्नड चित्रपटाचे निर्माते रॉकलिन व्यंकटेश यांनी विकत घेतले. यात तेलुगू, कन्नड, तमिळ आणि मल्याळम भाषेचा समावेश आहे. कन्नड भाषेतील सैराटचा रिमेक ‘मनसु मल्लिगे’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळाला. या वर्षी रिलिज झालेल्या इतर कन्नड चित्रपटांपेक्षा त्याचे कलेक्शन हे अधिक आहे.

बॉलिवूडमधील आणखी एका प्रसिद्ध दिग्दर्शकाला या चित्रपटाने भुरळ घातली तो दिग्दर्शक म्हणजे करण जोहर आहे. या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्याचे करण जोहरने आधीच जाहीर केले आहे. हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होणार असून या चित्रपटाची निर्मिती ही सैराटचे निर्मातेच करणार आहे. या चित्रपटात कोण असणार यासाठी अनेक नाव आघाडीवर आहेत. यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर यांची नावे चर्चेत आहेत. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर हिचे नाव यात आघाडीवर आहे.

Web Title: Sairat's remake in four more languages