पेटीएमचे आता फूड वॉलेट


मुंबई: आता फूड वॉलेट ही सेवा पेटीएमने सुरू केल्यामुळे कर-बचतीची संधी कॉर्पोरेट कर्मचार्‍यांना मिळणार आहे. कंपन्या सरकारद्वारा मान्य कर सवलतीच्या चौकटीत राहून या उपक्रमामुळे आपल्या कर्मचार्‍यांना खाद्यान्न भत्ता देऊ शकणार आहेत. पेटीएम अॅपमध्ये फूड वॉलेट उपलब्ध असेल आणि कर्मचार्‍यांना मिळणारा खाद्यान्न भत्ता हा डिजिटल असणार असल्यामुळे तो संपण्याची अथवा त्याचे नुकसान होण्याची जोखीम दूर होणार आहे.

पेटीएमच्या फूड वॉलेटचा जबरदस्त इंटरफेस असून कर्मचारी ज्यात पासबुकमध्ये वास्तविक बॅलेन्स पाहू शकतील. तसेच अगदी जवळचे फूड आऊटलेट अॅपवरील नियरबाय या ऑप्शनमधून शोधू शकणार आहेत. या वॉलेटचा उपयोग कचेरीच्या कॅफेटेरियामध्ये तसेच अनेक ऑनलाइन आणि अगदी लहानशा दुकानापासून प्रत्यक्ष व्यापार्‍यांकडे करता येणार आहे. यामध्ये केएफसी, बर्गर किंग, झोमॅटो, पिझ्झा हट, कॅफे कॉफी डे, बिग बझार आदींचा समावेश आहे.

Leave a Comment