जिओ देणार आता डबल डेटा


मुंबई : आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर जिओ आणत असून आता पुन्हा एकदा जिओने नवी ऑफर आणली आहे. जिओ आणि सॅमसंगने एकत्र येत ही ऑफर जाहीर केली आहे. तुम्ही जर नवीन सॅमसंग गॅलेक्सी एस८ किंवा गॅलेक्सी एस-८ प्लस घेतला तर ही ऑफर तुम्हाला मिळणार आहे.

३०९ रुपयांच्या मासिक रिचार्जवर ४४८जीबी ४जी डेटा ८ महिन्यांसाठी मिळणार आहे. म्हणजेच दिवसाला २ जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच धन धना धन ऑफरच्या दुप्पट डेटा तुम्हाला मिळणार आहे. ही ऑफर ५ मे पासून ८ महिन्यांसाठी असणार आहे. ही ऑफर फक्त जिओ युजर्ससाठी असणार आहे. ज्यांनी प्राईम मेंबरशिप घेतली आहे.

Leave a Comment