ट्रेन लेट होण्याच्या प्रमाणात यावर्षी तिपटीने वाढ


मुंबई: मोदी सरकारच्या कार्यकाळात अच्छे दिन अजून दूरच असल्याचे जाणवत असून सध्या रेल्वे प्रवाशांना ‘बुरे दिन’चा प्रत्यय घ्यावा लागत आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हजारो १५ तासांपेक्षा लेट होत आहेत.

एका सर्वेक्षणानुसार २०१५च्या तुलनेत २०१७मध्ये गाड्या १५ तासपेक्षा अधिक ट्रेन लेट होण्याच्या प्रमाणात तिप्पट वाढ झाली आहे. ट्रेन १५ तासांपेक्षा लेट होण्याची संख्या २०१५ मध्ये ४७९ होती. तर २०१७मध्ये हे प्रमाण वाढून ११३७ झाले आहे. यात शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसचाही समावेश आहे.

ट्रेन सुविधा डॉट कॉम या वेबसाईटनं तयार केलेल्या सर्वेक्षणानुसार राजधानी एक्सप्रेस २०१७मध्ये ५३ वेळा, शताब्दी एक्सप्रेस १९ वेळा, गरीब रथ ४६ वेळा, तर सुपरफास्ट एक्सप्रेस ४६ वेळा आणि एक्सप्रेस ट्रेन ४५१ वेळा उशीरा पोहोचल्या आहेत. २०१७ मध्ये १५तासांपेक्षा अधिक उशीर लावणा-या गाड्यांची संख्या १३३७ आहे, जी २०१६ मध्ये ४३० होती. तर १० तासांपेक्षा उशिरा चालणा-या ट्रेनची संख्या २०१७ मध्ये ४६१९ आहे, तर २०१६ मध्ये २६४१ ऐवढी होती. दोन तासांपेक्षा जास्त उशिरा धावणा-या ट्रेनची संख्या २०१७ मध्ये ९५६४ आहे तर २०१६मध्ये हे प्रमाण ७४४१ एवढे होते.

उशिरा धावणा-या टॉप टेन ट्रेनची यादी या वेबसाईटने जाहीर केली आहे. यात सात ट्रेन या फक्त बिहारमधून जातात किंवा बिहारमधीलच आहेत. यात बिहार जाणारी स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस पहिल्या क्रमांकावर आहे. जी १ जानेवारी २०१७ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत ८० वेळा धावली आणि प्रत्येक वेळी ही ट्रेन लेट होती. ही ट्रेन राजस्थानच्या श्रीगंगानगरहून उत्तर प्रदेश बिहार करत पश्चिम बंगालच्या हावडा येथे जाते. ८० दिवसांपैकी ३२ दिवस ही ट्रेन १५ तासांपेक्षा अधिक वेळा लेट होती.

Leave a Comment