Skip links

अतिलठ्ठ इमान झाली स्लीम!


मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत अतिलठ्ठपणामुळे उपचार घेत असलेली इमान अहमद आता बऱ्यापैकी बारीक झाली असून ती तंदुरुस्तही झाली आहे. इमानवर उपचार करत असलेल्या सैफी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी उपचारांना उत्तम प्रतिसाद देत असलेल्या इमानचा व्हिडिओ यूट्युबवर शेअर केला आहे. याआधी इमानवर उपचार करत असलेल्या डॉ. लकडावाला यांनी तिच्या वजनात मोठी घट झाल्याचे सांगितले होते.

फेब्रुवारीमध्ये इजिप्तची नागरिक असलेल्या इमानला तिच्या अतिलठ्ठपणावर उपचार करण्यासाठी भारतात आणण्यात आले होते. त्यावेळी इमानचे वजन ५००० किलोहून अधिक होते. त्यानंतर तिचे वजन कमी करण्यासाठी मार्चमध्ये तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तिच्या वजनात २५०० किलोहून अधिक घट झाली. सैफी रुग्णालयातील डॉक्टरांनी बऱ्यापैकी फिट झालेल्या इमानचा व्हिडिओ शेअर केला असून, त्यात इमान आधीपेक्षा अधिक तंदुरुस्त झाल्याचे दिसत आहे. इमान आता बऱ्यापैकी तंदुरुस्त झाली आहे. ती आता व्हिलचेअऱवर बसू शकते. तसेच बराच काळ बसून राहणेही तिला शक्य होत आहे.

Web Title: iman ahmed goes Very slim!