… अन् अजान ऐकून सलमानने थांबवली पत्रकार परिषद


मंदिर, मशिद आणि गुरुद्वारांमध्ये लावण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकरवर गायक सोनू निगमने १७ एप्रिलला ट्विट करुन प्रश्न उपस्थित केले होते. त्याने ट्विटरवरुन मी मुस्लिम नाही तरी मला अजानच्या आवाजाने माझी झोपमोड होते. ही जबरदस्तीने लादण्यात आलेली धार्मिकता कधी थांबणार?’ असा प्रश्न विचारला होता. यावेळी फक्त मशिदीचाच उल्लेख सोनूने केला असे नाही, तर इतर धर्माबद्दलही त्याचे हेच म्हणणे आहे. पण, यूट्यूबवर याचसंदर्भातला असा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात पाहिला जातो आहे, ज्यात बॉलिवूडच्या ‘दबंग’ने अर्थात सलमानने अजानचा आवाज ऐकू येताच पत्रकार परिषद थांबवली होती.

एक पत्रकार परिषद ‘बिग बॉस ८’ या रिअॅलिटी शोसाठी घेण्यात आली होती. चॅनेलचे एक अधिकारी सलमानसोबत स्टेजवरुन पत्रकारांशी संवाद साधत असताना अजान सुरू झाली. अजानचा आवाज ऐकताच सलमानने त्या अधिकाऱ्याला शांत राहायला सांगितले. यानंतर ते दोघेही खूप वेळ स्टेजवर अजान संपण्याची वाट बघत उभे असताना दिसले. जशी अजान संपली तशी पत्रकार परिषदेला पुन्हा सुरूवात झाली होती. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Web Title: ... and Salman stopped press conference listening to Azaan