बांबूच्या वापरातून बनणार फोर्ड कार


अमेरिकन ऑटो कंपनी फोर्डने त्यांच्या कार्समधील इंटिरियर साठी मजबूत नैसर्गिक बांबूचा वापर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार लवकरच सुपरहार्ड मटेरियल बांबू व प्लास्टीक यांचा एकत्रित वापर त्यांच्या उत्पादनांत केला जाईल. संशोधन विकास विभागाचे इंजिनिअर जॅनट यिन यांनी कार्सच्या इंटिरियर वापरासाठी बांबू ही नैसर्गिक वनस्पती अतिशय उत्तम ठरली असल्याचे सांगितले.

ते म्हणाले, बांबू मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो, तो मजबूत तर आहेच पण लवचिकही आहे. खराब झाल्यास तो बदलणे सहज शक्य आहे. यामुळे गेल्या वर्षातच फोर्ड सप्लायर्सबरोबर बांबू व प्लास्टीक यांच्या एकत्र वापरातून इंटिरियर करण्याचे ठरविले आहे. अन्य सिंथेटक अथवा नैसर्गिक फायबरच्या तुलनेत बांबू अधिक सरस आहे व तो उच्च उष्णता सहन करू शकतो हे चाचण्यातून सिद्ध झाले आहे. याचबरोबर केनफ या कापूस वर्गातील वनस्पतीपासून कारचे दरवाजे बनविण्याबाबतही प्रयोग सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment