सहारा समुहाच्या मालमत्ता खरेदीत टाटा, पतंजलीला रस


सर्वोच्च न्यायालयाने सेबीकडे सहारा समुहाकडून भरावयची रक्कम गोळा करण्यासाठी सहारा समुहाच्या ३० मालमत्ता विक्रीचे आदेश दिले असतानाच या मालमत्ता खरेदीत टाटा समूह, पतंजली समूह, अडाणी ग्रुप सह अनेक रियल इस्टेट व्यवसायातील लोकांनी रस दाखविला असल्याचे समजते. या मालमत्तांतून ७४०० कोटींची रक्कम जमा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या खरेदीदारांना अंतिम बोली सादर करण्याचे आदेश दिले गेल्याचेही सांगितले जात आहे.

सहाराच्या भूखंडासाठी ओमॅक्ट व एल्डको रियल इस्टेट कंपन्या इच्छुक आहेत त्याचबरोबर इंडियन ऑईल कंपनीनेही त्यात रस दाखविला आहे. लखनौ येथील सहारा हॉस्पिटलमध्ये चेन्नईच्या अपोलोला रस आहे. या मालमत्तांची विक्री करण्याची तातडी असल्याने विक्री प्रक्रिया व व्हॅल्यूएशनवर त्याचा परिणाम होऊ शकतो असे सहारा व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.इच्छुक खरेदीदारांनी या व्यवहारांच्या पूर्ततेसाठी दोन ते तीन महिन्यांची मुदत मागितली आहे व हाय व्हॅल्यू व्यवहारांसाठी एवढी मुदत नेहमीच दिली जाते पुण्यातील एका भूखंडात गोदरेजने रस दाखविला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने लोणावळ्यातील सहारा अँबी व्हॅलीचा लिलाव करण्याचे आदेश यापूर्वीच दिले असून या मालमत्तेची अंदाजे किमत १ लाख कोटी वर्तविली गेली आहे.

Leave a Comment