बाहुबली थाळीचा घेता येणार आस्वाद


येत्या २८ एप्रिलला बाहुबलीचा दुसरा भाग प्रदर्शित होत आहे व प्रेक्षकांना कटाप्पाने बाहुबलीला का मारले याचे उत्तर त्यात मिळणार आहे. बाहुबलीचे देशभरात करोडो चाहते आहेत. अहमदाबाद येथील हॉटेल राजवाडूचे मालक राजेश व मनीष पटेल यांचा त्यात पहिला नंबर लागावा. कारण बाहुबली त्यांनी अनेक वेळा पाहिला तर आहेच पण बाहुबलीच्या आठवणी ताज्या रहाव्यात यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये खास बाहुबली थाळी सुरू केली आहे. बाहुबलीच्या भव्यतेप्रमाणेच ही थाळी भव्य व रसिकांची जिव्हातृप्ती करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हॉटेल राजवाडू हे ग्रामीण थीमवर आधारलेले हॉटेल असून ते हिरवाईने नटलेले आहे. या हॉटेलला अनेक ग्राहक आवर्जून भेट देतात. त्यात बाहुबलीचे चाहते असतील तर त्यांच्यासाठी बाहुबली थाळी खास मेजवानी ठरणार आहे. या हॉटेलमध्ये गुजराथी व राजस्थानी पद्धतीचे खाद्यपदार्थ मिळतात.