नेदरलँडमधील गेथूर्न- सुंदर पाणवाटांचे गांव


एखाद्या गावात रस्ते नाहीत तर कालव्यातूनच तेथील सर्व वाहतूक होते हे ऐकायला मजेशीर वाटत असले तरी अशी अनेक गांवे जगात आहेत. पैकी व्हेनिस हे त्यातील सर्वात प्रसिद्ध शहर. मात्र येथेही थोडेफार रस्ते आहेत. बॅकॉकचीही बरीच रहदारी पाणवाटांवरून होत असली तरी येथेही थोडे रस्ते आहेतच. मात्र नेदरलँडमधील गेथूर्न हे निसर्गाचे वरदान लाभलेले छोटेसे गांव मात्र पूर्णपणे कालव्यांचे गांव आहे. हे काही बेट नाही ११७० साली येथे पुराचे पाणी भरले ते निघाले नाही तेव्हा १२३० साली येथे कालवे काढून त्याच्या काठांवर हे गांव वसविले गेल्याचे सांगितले जाते. दक्षिणेचे व्हेनिस अशी या गावाची प्रसिद्धी असून पर्यटकांचे हे आवडते ठिकाण आहे.


गावांत रस्ते नाहीत त्यामुळे सर्व वाहतूक छोट्या छोट्या इलेक्ट्रीक बोटीतून होते. रस्ते नसल्याने येथे कार्स नाहीत तसेच बाईक्स, सायकल्ससारखी वाहनेही नाहीत. हे गांव इतके सुंदर आहे की पर्यटकांनी एकदा येथे भेट दिली की कायम येथेच वास्तव्य करावे असा मोह त्यांना होतो. कांही ठिकाणी लाकडाचे छोटेछोटे पूल बांधले गेले आहेत. या गावात ७.५ किमी लांबीचे कालवे आहेत.१९५८ साली डच कॉमेडी फनफेयर या चित्रपटाचे शूटिग येथे झाले होते. त्यामुळेही या गावाला जागतिक पातळीवर पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धी मिळाली.

Leave a Comment