टेलिनॉर केवळ ७५ रुपयांत देणार महिनाभर अनलिमिटेड ४जी डाटा


नवी दिल्ली : देशातील टेलिकॉम क्षेत्रात ‘जिओ’ने भरलेल्या धडकीमुळे बाजारात खळबळ सुरू झालेली आहे. नॉर्वेची टेलिकॉम कंपनी टेलिनॉर इंडियाने अनलिमिटेड ४जी पॅक लॉन्च केले आहे. या कंपनीचे देशातील काही ठराविक सर्कलमध्येच ४जी सर्व्हिस सुरू आहे. टेलिनॉरने FR७३ प्लान लॉन्च केला आहे. केवळ नव्या युझर्ससाठी हा प्लान आहे.

याबाबतचे वृत्त ‘टेलिकॉम टॉक’ने दिले असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्लानमध्ये २५ पैसे प्रति मिनिटच्या दराने एसटीडी व्हॉईस कॉल असतील. हा प्लान ९० दिवसांसाठी वैध असेल. तसेच २५ रुपयांचा टॉकटाईमही यामध्ये फ्री मिळेल. या प्लानमध्ये ग्राहकांना २८ दिवसांसाठी अनलिमिटेड ४जी डाटा दिला जाईल. याशिवाय ग्राहक दुसऱ्या महिन्यात ४७ रुपयांचे रिचार्ज करून पुढच्या एका महिन्यापर्यंत अनलिमिटेड इंटरनेट सेवेचा लाभ घेऊ शकतील. ७३ रुपयांच्या रिचार्जनंतर १२० दिवसांच्या आता दुसरा रिचार्ज करावे लागेल. १२० दिवसानंतर रिचार्ज केल्यानंतर केवळ ४००एमबी ४जी डाटा मिळेल.

Leave a Comment