दोन हजारापेक्षा कमी रकमेचा चेक भरल्यास पडणार दंड!


मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डाचे बिल दोन हजारापेक्षा कमी असेल, तर हे बिल भरताना चेकचा वापर करू नका. एसबीआय कार्ड कंपनी तुम्हाला कारण दोन हजारापेक्षा कमी रकमेचा चेक भरल्यास १०० रुपये दंड आकारण्याची शक्यता आहे.

हा नियम एक एप्रिलपासून लागू करण्यात आला असून हा नियम कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी लागू केल्याचा कंपनीचा दावा आहे. कंपनीचे ९० टक्के ग्राहक सध्या इलेक्ट्रोनिक पद्धतीने बिलाचे पेमेंट करतात. उरलेल्या ग्राहकांनीही याच पद्धतीला प्राधान्य द्यावे यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे बँकेचे म्हणणे आहे.

Leave a Comment