केवळ ३ रुपये प्रति मिनिट जिओचा इंटरनॅशनल कॉल


नवी दिल्ली : फ्री डेटा आणि कॉलिंगची ऑफर रिलायन्स जिओने ग्राहकांना दिल्यानंतर आता इंटरनॅशनल कॉलिंग अर्थात आयएसडीबाबतही नवी ऑफर जाहीर केली आहे. जिओच्या नव्या रेट कटर ऑफरअंतर्गत ग्राहकांना अमेरिका आणि युकेमध्ये कॉलिंगसाठी प्रतिमिनिट केवळ ३ रुपये चार्ज होणार आहेत.

जिओच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार रेट कटर ऑफरसाठी ५०१ रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. तज्ञांच्या मते, रिलायन्स जिओच्या या नव्या ऑफरमुळे इतर टेलिकॉम कंपन्या भारतीय एअरटेल, आयडिया आणि वोडाफोन या कंपन्यांवरही कॉल रेट कमी करण्यासाठीचा दबाव वाढू शकतो.

Leave a Comment