तुम्ही सती प्रथा लागू करा आम्ही ट्रीपल तलाक बंद करतो


रामपूर (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्रीपल तलाकसंदर्भात भाष्य केल्याच्या पार्श्‍वभूमीवर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. तोंडी तलाकबाबत बोलताना मुस्लिमांनी सती प्रथेला विरोध केला आहे का? असा प्रश्‍न उपस्थित करत आधी सती प्रथा सुरू करा, असे वक्तव्य केले आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आझम खान म्हणाले, ट्रीपल तलाकसंदर्भात कायदा बनविण्यापासून तुम्हाला कोणी रोखले आहे. पण आधी मला सांगा की मुस्लिमांनी सती प्रथेला विरोध केला आहे का? सती प्रथा हा हिंदू संस्कृतीतील एक भाग आहे. ती आधी लागू करा. आदित्यनाथ यांनी ‘तोंडी तलाक’च्या मुद्यावर काही जणांनी पाळलेले मौन पाहून आश्‍चर्य वाटत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. याचबरोबर, तोंडी तलाकच्या मुद्यासंदर्भात मौन पाळणारेही दोषीच असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली होती.